धामणगाव(रेल्वे)दि.15ः- तालुक्यातील अंजनशिंगी येथील कान्होजीबाबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्याल येथे पं.जवाहरलाल नेहरु जयंती निमित्ताने बालदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्राचार्य बी एम गाढवे यांनी प्रतिमेला माल्यार्पन करुन कार्यक्रमाला सुरुवात केली.विद्यार्थांनी कथा,कविता,मनोगत व्यक्त केले.वर्ग ५ ते १२ च्या विद्यार्थांकडून बालआनंद उत्सव साजरा करण्यात आला.आर जी पवार,प्रा.दिपक अंबरते, मेघाताई गुल्हाने, विनोद इंगोले यांनी मनोगत व्यक्त केले.मनोज सोळंके,सुभाष नांदणे,गोपाल कांडलकर, सुनील नांदणे यांनी सहकार्य केले.सुत्रसंचालन एल डि देशमुख,प्रास्तविक प्रा.मंजुषा बुरिले, आभार सतिश उईके यांनी मानले.




