33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News गोवंश हत्या बंदीच्या कायद्याला स्थगिती नाही – मुंबई हायकोर्ट

गोवंश हत्या बंदीच्या कायद्याला स्थगिती नाही – मुंबई हायकोर्ट

0
21

blank

मुंबई- गोवंश हत्याबंदीबाबत राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्यच असून गोवंश हत्याबंदी कायद्याला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट नकार दिला. यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र गोमांस बाळगणा-यांवर उच्च न्यायालयाचा यासंदर्भातील अंतिम निर्णय येईपर्यंत कोणतीही कारवाई करु नये, असे आदेशही उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत.
गोवंश हत्या बंदी कायद्यावर मार्चमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केल्यानंतर महाराष्ट्रात हा कायदा लागू झाला आहे.
यानुसार परराज्यातून आलेल्या गोमांसचे सेवन व बाळगणे हे सुद्धा गु्न्हा ठरत असून या कलमांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात तीन वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्या होत्या. या कलमांमुळे माणसाच्या मुलभूत हक्कावरच गदा येत असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी म्हटले होते.
मात्र उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर गोवंश हत्याबंदीच्या कायद्याला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायम राहणार आहे.

blank