नांदेड, दि.2 डिसेंबर: शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये रब्बी हंगामाकरिता हरभरा, गहू या पिकाची लागवड केलीआहे.इसापूर लाभ क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या डाव्या व उजव्या कालव्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांकरिता आवश्यक पाणी सोडण्यासाठी इसापुर धरणातील रब्बी हंगामासाठी आरक्षित पाण्याच लवकरात लवकर नियोजन करून शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता पाण्याच्या पाळ्या द्याव्यात, याकरता कालवा-सल्लागार समितीची लवकरात लवकर बैठक आयोजित करून हा प्रश्न सोडवावा अशी आग्रही मागणी प्रशासनाकडे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य भागवत देवसरकर यांनी केली आहे.
इसापूर धरणाच्या लाभक्षेत्रातील गावात यावर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हरभरा, गहू या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे,या पिकासाठी आता ईसापुर धरणातून पाण्याच्या पाळ्या सोडण्याकरता कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात येत असते, परंतु अद्यापही या कालवा सल्लागार समितीची बैठक झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे,यावर्षी ईसापुर धरण 80 टक्के भरले असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकाला पाणी सात ते आठ वेळा पाण्याच्या पाळ्या मिळतील अशी आशा आहे शेतकरी बांधवांना आहे, याबाबत प्रशासनाने लवकरात लवकर कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन पाण्याच्या पाळ्या चे त्वरित नियोजन करावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व रब्बी हंगामाकरिता इसापुर धरणातील पाणी त्वरित सोडावे व शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी योग्य त्या वेळेत पाण्याची उपलब्धता करून द्यावी जेणेकरून खरीप हंगामात वाया गेलेली पिकाची रब्बी हंगामात भरपाई होईल अशी आशा आहे यामुळे हा प्रश्न लवकर सोडावावा अशी आग्रही मागणी यावेळी प्रशासनाकडे भागवत देवसरकर यांनी केली आहे.




