34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home क्रीडा आज 3 डिसेंबरला दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा

आज 3 डिसेंबरला दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा

0
29

गोंदिया,दि.3 : सांस्कृतिक कार्यक्रम समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद गोंदिया आणि दिव्यांगांच्या शासनाने विशेष शाळा व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने आज3 डिसेंबर 2019 रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन पोलीस मुख्यालय मैदान कारंजा गोंदिया येथे करण्यात आले आहे.           3 डिसेंबर रोजी सकाळी आडेआठ वाजता दिव्यांग विद्यार्थ्यांची इंदिरा गांधी स्टेडियम ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी असतील, तर उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी राहतील. जि.प.समाजकल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे प्रमुख अतिथी म्हणून तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.ई.ए.हाश्मी हे उपस्थित राहणार आहेत.

सकाळी साडेदहा वाजता पोलीस मुख्यालय मैदान कारंजा येथील दिव्यांग विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, उद्घाटक म्हणून जि.प.उपाध्यक्ष अल्ताफ अकबर अली हमीद तर जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवाने, महिला बालकल्याण समिती सभापती लता दोनोडे, शिक्षण व आरोग्य समिती सभापती रमेश अंबुले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.ई.ए.हाश्मी व जिल्हा क्रीडा अधिकारी मुश्ताक पटेल यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.

यावेळी समाज कल्याण समितीचे सदस्य छाया दसरे, शामकला पाचं, कमलेश्वरी लिल्हारे, विमल नागपुरे, विजय टेकाम, रोहिणी वरखडे, ज्योती वालदे, प्रिती रामटेके, शीला चव्हाण, भास्कर आत्राम, तेजुकला गहाणे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे. सात डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पोलीस मुख्यालय कारंजा येथे सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा मडावी, उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफ अकबर अली हमीद, विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे, समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवाने, महिला बालकल्याण समिती सभापती लता दोनोडे, शिक्षण व आरोग्य समिती सभापती रमेश अंबुले व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.ई.ए.हाश्मी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी तुकाराम बरगे यांनी केले आहे

 

blank