35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर,शिवसेनेकडे गृह तर काँग्रेसकडे महसूल,राऊत ओबीसीचे मंत्री

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर,शिवसेनेकडे गृह तर काँग्रेसकडे महसूल,राऊत ओबीसीचे मंत्री

0
38

blank

मुंबई, दि. 12 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. खातेवाटप पुढीलप्रमाणे…

   मंत्री महोदयांची नावे        खात्याची नावे

  1. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे,मुख्यमंत्री :         कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा त्यांचे भाग.
  2. श्री. एकनाथ संभाजी  शिंदे : गृह, नगर विकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण.
  3. श्री. छगन चंद्रकांत भुजबळ :   ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन.
  4. श्री. विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात :          महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय.
  5. श्री. सुभाष राजाराम देसाई : उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषि, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास.
  6. श्री. जयंत राजाराम पाटील : वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास.
  7. डॉ. नितीन काशिनाथ राऊत : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण.

blank