तुमसर,दि.२७ः-ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी मुख्य मागणीला घेऊन येत्या ४ जानेवारीला भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोच्र्याचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्ताने तुमसर तालुक्यात जनगणना जनजागृती अभियान राबविण्यात येत असून शनिवार २८ डिसेंबरला सकाळी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील राजाभोजनगरीत ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष व राजकीय समन्वयक डॉ.खुशाल बोपचे,गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष भैय्याजी लांबट,ओबीसी जनगणना परिषदेचे समन्वयक सदानंद इलमे,जिल्हा समन्वयक डॉ.बाळकृष्ण सार्वे,ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे,भंडारा जिल्हा ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष गोपाल सेलोकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्याला तालुक्यातील ओबीसी समाजबंधू भगिनीसह विद्यार्थी,कर्मचारी,अधिकारी,लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ओबीसी जनगणना परिषद शाखा तुमसर मोहाडीच्यावतीने गोपाल ठवकर,विश्वजीत फुंडे,हैशोक शरणागत,राजु कुकडकर,शंकर राऊत,हरिभाऊ बरडे,सुर्यंकांत सेलोकर,श्रीलाल बम्हनोटे,डॉ.शैलेश कुकडे,उपेंद्र रानपुरा,डॉ.आशिष माटे,आशिष वंजारी,लालुजी कटरे,अनिल जिभकाटे,अनंतलाल दमाहे,बाळाभाऊ ठाकूर यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे.




