भंडारा,दि. 28:- ४थे ‘मानाशक्ति समाज भुषण २०१९’ स्व. महादेवराव जांभुळे (गुरूजी) यांना डॉ. संजीव दोडके यांचे हस्ते देण्यात आला. गुरूजींचे सुपूत्र सुनिल म. जांभुळे व त्यांचे कुटूंबिय यांनी भंडारा येथे स्विकारला.स्व. जांभुळे गुरुजी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जंगल सत्याग्रहात सहभाग घेतला होता. स्वातंत्रोत्तर काळात त्यांनी शिक्षक म्हणून कार्य केले. या काळात त्यांनी सामाजिक व सांस्कृतिक कार्यात मोलाचे योगदान दिले. त्याप्रित्यर्थ त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार राज्यपाल सादिक अली यांचे हस्ते 1980 साली देण्यात आला.शाल, श्रीफळ, मानचिन्ह, प्रमाणपत्र, मानकाई चा फोटो व माना सत्यशोध पुस्तक देऊन स्व. महादेवराव जांभुळे यांचे समाजकार्य व समाजकार्याची प्रेरणा दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी गणपतराव जांभुळे, विश्वनाथ वाकडे, मारोतीराव नन्नावरे, नारायण गजबे व मानाशक्ति चे संपादक संजिव शेरकर उपस्थित होते.





