33.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News रस्त्यावर झोपणाऱ्यांना अभिजीतने म्हटले ‘कुत्ता’

रस्त्यावर झोपणाऱ्यांना अभिजीतने म्हटले ‘कुत्ता’

0
28

blank

मुंबई, दि. ६ – ‘कुत्ता रोड पे सोएगा तो कुत्ते की मौत मरेगा, रोड्स गरीब के बाप की नही है’ असे वादग्रस्त वक्तव्य गायक अभिजीत भट्टाचार्यने केल्याने नवा वाद उफाळला आहे. हिट अँड रन प्रकरणी न्यायालयाने अभिनेता सलमान खानला दोषी ठरवून त्याला ५ वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर बॉलिवूडमद्ये तीव्र नाराज पसरली असून अनेकांनी या निर्णयाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर अभिजितने ट्विटरवरून ही मुक्ताफळे उधळली आहेत.
फुटपाथवर झोपण्याची फार हौस असेल, तर अशा लोकांनी गावी जावे. तिथे कोणतीही गाडी अंगावर येणार नाही, असे ट्विट अभिजीत यांनी केले आहे. इतकेच नव्हे तर, “कुत्रे रस्त्यावर झोपले तर कुत्र्याचंच मरण मरतील. रस्ते हे गरीबांच्या बापाचे नाहीत. माझ्याकडेही घर नव्हते, म्हणून मी रस्त्यावर झोपलो नाही.” अशी मुक्ताफळे अभिजीत यांनी उधळली आहेत.
हिट अँड रन प्रकरणी आज सलमान खानला सेशन कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तेरा वर्षांपूर्वी मद्यधूंद अवस्थेत सलमान खानने मुंबईत फुटपाथवर झोपलेल्या लोकांना आपल्या कारने चिरडले होते. कोर्टाने सलमानला शिक्षा सुनावल्यानंतर अभिजीतने ट्विटरवर हे वादग्रस्त ट्विट केले. आता त्याच्या या वक्तव्याने मोठ्या वादाला तोंड फोडले हे नक्की.

blank