जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ११ जानेवारीला जिल्ह्यात ३२ केंद्रावर होणार

0
30

नवेगावबांध(सतिश कोसरकर)दि.10 : गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता ६ वी मध्ये सत्र २0२0-२१ करिता प्रवेश घेण्याकरिता प्रवेश परीक्षेचे आयोजन दिं. ११ जानेवारीला सकाळी ११.१५ वाजेपासून ते दुपारी १.३0 वाजेच्या दरम्यान करण्यात आले आहे. यासाठी गोंदिया जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ३२ केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील एकूण ८३७१ विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत. अशी माहिती प्राचार्य एम.एस.बलविर जवाहर नवोदय विद्यालय नवेगावबांध यांनी दिली आहे. परीक्षेला प्रविष्ट झालेल्या उमेदवारांनी वेळे च्या आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. जे उमेदवार ११:३0 वाजेनंतर उशिरा परीक्षा केंद्रावर येतील.अशा उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.अशा उमेदवारांना सीबीएससी परीक्षा बोर्डाच्या नियमानुसार परीक्षेला बसता येणार नाही. याची नोंद उमेदवारांनी व पालकांनी घ्यावी. असे आवाहन प्राचार्य एम. एस. बलवीर, जवाहर नवोदय विद्यालय नवेगावबांध यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.