33.8 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home विदर्भ छत्रपतींच्या स्वप्नातील जाती विरहित समाज तयार करा -ब्रजभूषण बैस

छत्रपतींच्या स्वप्नातील जाती विरहित समाज तयार करा -ब्रजभूषण बैस

0
63
सालेकसा,दि.21ः- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात कधीही जातिभेद मानले गेले नाही.त्यांनी नेहमीच सामाजिक एकोपा जपण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सैन्यात विविध जाती आणि धर्मांचे लोक मावळा म्हणून कार्य करत असत सर्व जातीला आणि धर्माला ‘मावळा’ या शब्दात बांधण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात केले. आज त्याच एकोप्याची गरज समाजाला आहे असे विचार महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष ब्रजभूषण यांनी केले. ते कहाली येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्राम कहाली येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका सालेकसा तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कहानी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शिवदिंडी’ कार्यक्रम घेण्यात आले. त्यात शाळकरी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून प्रभात फेरी काढत शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत संपूर्ण कहाली गावाचे भ्रमण केले. तसेच शाळेच्या परिसरात वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. त्यात परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रमाणपत्र स्वीकार केले. तसेच कार्यक्रमाच्या दुसर्‍या पर्वाला  रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धन्वंतरी रक्त तपासणी च्या संपूर्ण चमुने सहभागी होऊन एकूण 190 गावकऱ्यांचे रक्तगट तपासून घेतले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ग्रामपंचायत कहाली चे सरपंच घनश्यामजी मोहारे उपस्थित होते. उद्घाटक म्हणून ब्रजभूषण आणि प्रमुख अतिथी रूपाने मनसे गोंदिया तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे, अमित मुख्याध्यापक आर  सी बोरकर, सहाय्यक शिक्षक  एस टी रहांगडाले, एम टी बैथवार, अभियंता लपा विभाग शैलेंद्र मेश्राम, ग्राम पंचायत सदस्य योगराज मरसकोल्हे इत्यादी मंडळी मंचावर उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक आणि वक्ते म्हणून दीपक बहेकार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना अंगीकारून आचरणात आणण्याचे आव्हान केले. कार्यक्रमाची प्रस्तावना उद्देश शहारे यांनी मांडली तर सूत्रसंचालन मंगेश हत्तीमारे आणि राहुल हटवार यांनी केले.
 आभार प्रदर्शन विशाल अंबादे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा कहाली च्या संपूर्ण मनसैनिकांनी परिश्रम घेतले.