गोंदिया दि.22:: केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार व्यापक प्रमाणात नागरिक स्वयंस्फुर्तीने तपासणीस येतील याकरीता गोंदिया तालुक्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत स्पर्श कुष्ठरोग अभियान महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2020 पर्यंत स्पर्श कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती पंधरवाडा जिल्ह्यात राबविण्यात आला. त्यानिमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र कामठा येथील जय रामदास आदिवासी आश्रमशाळा कामठा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ.सीमा यादव, सहायक संचालक कुष्ठरोग कार्यालय गोंदिया यांनी कुष्ठरोग व क्षयरोगबाबत मार्गदर्शन केले. वैद्यकीय अधिकारी डॉ.गुरलवार यांनी उपस्थितांना प्रतिक्षा दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वेशभुषा घालून संदेश देवून पथनाट्य सादर केले.
कार्यक्रमाला आरोग्य सेवा कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ.रा.ज.पराडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चौरागडे, मुख्याध्यापक जे.ए.मेश्राम, पी.आर.कापगते, जिल्हा समन्वयक (क्षयरोग) प्रज्ञा कांबळे, रविंद्र जाधव यांचेसह शिक्षक व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आर.आर.चुटे यांनी केले. उपस्थितांचे आभार पी.आर.चुटे यांनी मानले.





