32.1 C
Gondiā
Thursday, June 18, 2026
Home रोजगार/व्यापार कृषि विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रम  1 मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित

कृषि विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रम  1 मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित

0
198

गोंदिया : जिल्ह्यातील कृषि निविष्ठा विक्रेते यांचेकरीता कृषि विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रमाकरीता प्रवेश देण्यासाठी 1 मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहे. निविष्ठा विक्रेता हा परवानाधारक व गोंदिया जिल्ह्याचा रहिवासी असावा. त्याची शैक्षणिक पात्रता किमान दहावी असावी. विहित नमुन्यातील अर्ज पूर्णपणे भरुन विक्रेत्यांची संपूर्ण माहिती, वैध परवाना, 10 वीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड यांच्या छायांकीत प्रती व 3 पासपोर्ट आकाराचे फोटोसह 1 मार्च 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रकल्प संचालक आत्मा, गोंदिया कार्यालयात सादर करावा. अर्जाचा नमूना व मार्गदर्शक सूचनेकरीता आत्मा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रकल्प संचालक (आत्मा) गोंदिया यांनी कळविले आहे.