सुनिल तुरकर यांना राष्ट्रीय स्टार महाराष्ट्र दर्पण पुरस्कार जाहीर

0
92

भंडारा,दि.04ः रहिकवार ब्रदर्श फिल्म प्रोडक्शन च्या राष्ट्रीय पुरस्कार निवड समितीने महाराष्ट्र राज्याच्या नावलौकिक विकास कार्यासाठी सामाजिक व पत्रकारिता या क्षेत्रातील योगदानाबद्दल “रहीकवार ब्रदर्स फिल्म प्रॉडक्शनचा” ” राष्ट्रीय स्टार महाराष्ट्र दर्पण पुरस्कार 2020″ साठी न्यूज प्रभात चे कार्यकारी संपादक सुनील श्यामलाल तुरकर यांची निवड केली आहे.सुनील तुरकर हे मागील तेरा वर्षापासून गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागात शिक्षक म्हणून सेवा देत आहेत. न्यूज प्रभात या डिजिटल न्यूज नेटवर्क मधे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी आगळी वेगळी छाप सोडली आहे.स्व.बाबा आमटे बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामजिक कार्य केले आहे.त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून आर.बी.फिल्म प्रोडक्शनतर्फे दरवर्षी दिला जातो.अनेक मान्यवरांनी प्रभात न्यूज चे कार्यकारी संपादक सुनील शामलाल तुरकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.