गोंदिया,दि.0४ः-निसर्गरम्य, जंगलाने वेढलेल्या अशा नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या थाडेझरी ही वसाहत शौचालय वापराच्या बाबतीत जिल्ह्यातील इतर गावांना स्वच्छतेचा संदेश देत आहे.
सडक-अर्जुनी तालुक्यातील ककोसमतोंडी ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेले थाडेझरी हे २00 ते ३00 लोक वस्तीचे गाव ग्रामपंचायतीपासूून तीन किलोमीटर आत नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव क्षेत्रात (बफरझाोन) हे गाव बसलेले आहे. आजूबाजूने घनदाट जंगलाने वेढलेल्या या गावात ११0 कुटुंबांचे वास्तव्य यापैकी ९0 कुटुंबांकडे पक्के शौचालय बांधकाम आलेले आहे. ७ कुटुंबांकडे वाढीव कुटुंब म्हणून शौचालय बांधकाम सुरू आहे. आणि उर्वरित कुटुंबांनी स्वत: बांधककाम करून स्वच्छ भारत मिशन योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. विशेष म्हणजे जंगलाने व्यापलेले गाव असल्याने शौचालयाचा वापर आहेत. या ठिकाणी जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागगाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राठोड, शालेय स्वच्छता तज्ज्ञ भागचंद्र रहांगडाले, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश उखळकर, अभियंता पटले यांनी भेट देऊन संपूर्ण गावातील शौचालय व वापराबाबत माहिती घेतली. विशेष म्हणजे अति दुर्गम व जंगल व्याप्त या गावात १ ते ४ थी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असून २३ विद्यार्थी या शाळेत विद्यार्जन करित आहेत. शालेय परिसरात स्वच्छता ही वाखाण्याजोगी असून शौचालयाचाही नियमित वापर विद्यार्थी ककरतांना दिसत आहेत. विशेष म्हणजे थाडेझरी हे जंगल व्याप्त गगाव स्वच्छतेचा संदेश देत असल्याचे जाणवत आहे.