
गोंदिया,दि.०५ः- महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी युनियन गोंदिया जिल्हा शाखेच्यावतीने हा मोर्चा फुलचूर नाका येथून काढण्यात आला.या मोच्र्याचे नेतृत्व दिलीप उठाणे,हौसलाल रहागंडाले,शंकुतला फqटग,आम्रकला डोंगरे,जिवनकला वैद्य,सुनिता मलगाम,राजलक्ष्मी हरिणखेडे,पौर्णिमा चुटे,बिरजुला तिडके,लालेश्वरी शरणागत,अर्चना मेश्राम,पुष्पा भगत,प्रणिता रंगारी,भुमेश्वरी रहागंडाले,ज्योती लिल्हारे,विठा पवार आदींनी केले.आंदोलनानंतर महिला बालविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले.
अंगणवाडी सेविका,मदतनिस,मिनिअंगणवाडीसह मानधनावर काम करणाèयाना २१ हजार रुपये किमान वेतन लागु करणे,महागाई निर्देशांकानुसार १० हजार दरमहा पेंशन लागू करणे,आक्टोंबर २०१८ ते जुर्ले २०१९ पर्यंतचे बकाया एरीयस देणे,साडी ड्रेसेसचे परिवर्तन निधीची थकीत रक्कम देणे,प्रवास भत्याचे प्रलqबत देयके मंजुर करण्यात यावे,अंगणवाडी सेविकामधून ५० टक्के पदे पर्यवेक्षिकांची भरण्यात यावे,सेवामुक्त सेविका मदतनिसांना एकमुस्त १ लाख रुपेय व ७५ हजार रुपये अजुनपर्यंत मिळालेले नाहीत ते देण्यात यावे.नविन अंगणवाडीचे बांधकाम करण्यात यावे आदी मागण्यासांठी हा मोर्चा निघालेला होता.मोर्चा जिल्हापरिषदेवर पोचल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आवारात रास्ता रोको करण्यात आले.