एकनाथ गोवर्धन कदम यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

0
108

माळसिरस,दि.05ःमाळशिरस तालुक्यातील जि.प आदर्श.प्रा.शाळा, चाकोरे येथे कार्यरत विषय शिक्षक एकनाथ कदम यांना जय-विजय प्राथमिक शिक्षक संघ सोलापूर यांचेमार्फत स.म.शंकरराव मोहिते-पाटील गुणवंत शिक्षक पुरस्कार ,अकलूज येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री  विजयसिंह मोहिते पाटील व जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी जि.प. सदस्या स्वरुपाराणी मोहिते पाटील, मंगल ताई वाघमोडे,सुनंदाताई फुले, सभापती पं. स. माळशिरस शोभाताई साठे इ. मान्यवर उपस्थित होते.
एकनाथ कदम यांची एकुण सेवा 22 वर्षे झाली असून सध्या ते विज्ञान विषय शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत.साक्षरता अभियानात उत्कृष्ट काम,विद्यार्थी व्यक्तीमत्व विकासासाठी नाविन्यपुर्ण उपक्रम राबविणे, गणित व विज्ञान विषयाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणुन उत्कृष्ट काम, प्रताप नगर शाळेत 117 वृक्षांची लागवड व वृक्ष संवर्धन,लोकसहभागातून शाळेसाठी भौतिक सुविधा प्राप्त करणे, विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग ची सुविधा उपलब्ध करणे, गुगल यु ट्युबचा अध्यापनात वापर करणे,विज्ञान प्रदर्शन मेळावे भरवणे इ.प्रकारे शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कामामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक भारत लवटे ,केंद्रप्रमुख गुरुनाथ स्वामी ,शिक्षण विस्तार अधिकारी महालिंग नकाते ,गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख. यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पतसंस्थेचे संस्थापक सुभाष मिसाळ, अध्यक्ष मोहन बाबर ,चेअरमन अशोक रुपनवर ,व्हा.चेअरमन हनुमंत लोहार , जेष्ठ संचालक ज्ञानोबा मस्के इ.मान्यवर व संचालक मंडळ उपस्थित होते.