
अकोला,दि.06 :डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित कृषी महाविद्यालयातील पदवीच्या तृतीय वर्षाच्या दुसऱ्या,चौथ्या व सहाव्या सत्राची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा ही सोबत होणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून मिळताच परीक्षार्थी विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली.त्यासोबतच परीक्षा व गुणात्मक विषयात अनेक अडचणी असल्यामुळे सर्व कृषीपदविकाधारक विद्यार्थी-विद्यार्थिनीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.त्यातच महाराष्ट नव निर्माण सेनेकडे शुभम पिपंळकर यांच्यामार्फेत साकडे घालून विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा करुन न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली.त्यास प्रतिसाद देत मनसे पदाधिकार्यानी अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठच्या प्रशासनाची भेट घेऊन अडचणी दूर करण्याची विनंती केली.यावर विद्यापीठ प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत विनंतीला मान देत सर्व समस्येचे निराकरण केले.विद्यापीठ प्रशासनाच्या कारभारामुळे अडचणीत आलेल्या विदर्भातील हजारो विद्यार्थ्यांना न्याय मिळत त्यांना फार मोठा दिलासा मिळाला.यावेळी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी मनसेचे आभार मानले.यावेळी मनसे राज्य उपाध्यक्ष आनंद एंबडवार, पंकज साबळे, सौरभ भगत, चंद्रकांत अग्रवाल, सचिन गव्हांळे,गोपाळ मुद्दगल,शुभम पिंपळकर आदी मनसे पदाधिकाऱ्यांसह अनेक महाराष्ट्र सैनिक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.