शासकीय वैद्यकीय महाविद्याल 700 बेडचे होणार-आ.अग्रवाल

0
116

गोंदिया,दि.06ःसुरवातील मंजुर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश क्षमता ही 100 विद्यार्थ्यांची असल्याने 500 खाटाचे रुग्णालय मंजुर करण्यात आले होते.मात्र वैद्यकिय शिक्षण परिषदेने परत 50 विद्यार्थ्यांची संख्या वाढविल्याने आता शासकीय रुग्णालयातील खाटांची संख्या 700 होणार आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी गेल्या सहा सात वर्षापासूनच कोट्यावधीचा निधी मंजुर झालेला असून इमारत बांधकाम अद्यापही झालेले नाही,त्यामुळे आमदार विनोद अग्रवाल यांनी  मुख्यमंत्री तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री,विधानसभा अध्यक्ष व खासदार प्रफुलभाई पटेल यांच्याकडे वैद्यकीय महाविद्यालय इमारतीचे काम लवकर सुरु करण्याची मागणी केली होती.खासदार पटेल यांनी पालकमंत्री व गृहमंत्री यांच्या उपस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा घेत वाढीव निधीसह 995 कोटींच्या वैद्यकिय काॅलेज बांधकामाचा नवीन प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाला सादर करण्यात आला असून त्यात सामान्य रुग्णांसाठी बेडची संख्या, प्रशस्त सभागृह, मोठे क्लासरूम, प्रशस्त वाचनालय, वसतीगृह अशा विविध विषयांमध्ये वाढ होणार आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याने त्यासोबतच आवश्यक बदल मात्र प्रलंबित होते. त्यावर आमदार विनोद अग्रवाल यांनी शासनस्तरावर मागणी तसेच पाठपुरावा करून वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक त्या सुविधा शासन दरबारी मंजूर करून घेण्याकरीता शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. शिवाय शिक्षकांची संख्या, कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा वाढणार असून याचा लाभ विद्यार्थ्यांना सकट रुग्णांना सुद्धा होणार आहे. शिक्षकांना तसेच कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाची सुद्धा व्यवस्था असणार आहे. मुलांचे तसेच मुलींचे वस्तीगृह साठी गृहपाल व्यवस्थापक परिचारक अशा विविध पदांसाठी सुद्धा नियुक्ती केली जाणार असून लवकरच विविध पदांच्या भरतीचे आदेश दिले जातील.
सध्यास्थितीत वैद्यकीय महाविद्यालयात 470 बेड सामान्य रुग्णांसाठी,15 बेड आयसीयू साठी आणि 15बेड दुर्घटना विभागासाठी मंजूर आहेत. ज्यात वाढ होऊन 650 बेड सामान्य रुग्णांसाठी तर 20 बेड अति दक्षता विभागात तर 25 बेड दुर्घटना विभागासाठी मंजूर करण्याची विनंती केली आहे. ज्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांना सुविधा मिळणार आहे.