मुंबई,दि.06 – महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर होत आहे.विधीमंडळात सकाळी 11 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करण्यास सुरवात केली.त्यापुर्वी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व अर्थराज्यमंत्री सुध्दा सोबत होते. यापुर्वी गुरुवारी अजित पवार यांनी विधानपरिषदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. मागील वेळेच्या तुलनेत यावेळी 57 हजार कोटींच्या महसुली तोटाचा बोजा पडला आहे. शेतकरी कर्जमाफी, सरकारी योजनांवरील बंदी यासह विविध विषयांवर भाजप सरकरला घेरण्याचा प्रयत्न करू शकेल.
पहिल्यांदाच सकाळी 11 वाजता सादर अर्थसंकल्प
आतापर्यंत विधानसभेत दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर होत होता. मात्र यावेळी पहिल्यांदाच सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर नवीन परंपरा महाविकास आघाडी सुरू करणार आहे. आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर 7 मार्च ते 10 मार्चपर्यंत विधानसभा बंद राहणार आहे.