गोंदिया,दि.07ः मानव विकास योजनेंतर्गत पंचायत समितीर्तंगत येत असलेल्या कटंगी कला येथील विमलताई विद्यालय,विज्ञान व व्होकेशनल कनिष्ठ महाविद्यालयाच्या 42 विद्यार्थीनींना पंचायत समिति सदस्य अखिलेश सेठ यांच्या हस्ते सायकलचे वितरण करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्या खुशबू टेंभरे,प्राचार्य बिसेन, प्रतिभा डोंगरवार,विनोद बिसेन, राजू मारवाड़े, गणेश लांजेवार, सदाशिव वाघाडे, उमेश बावनकर,पोलीस पाटिल शेखर कोहड़े,केंद्रप्रमुख मनोज दीक्षित,डोंगरे,विजू नेवारे,अल्ताफ शेख आदि उपस्थित होते.
तसेच गेल्या महिन्यात पार पडलेल्या आरोग्य तपासणी शिबिर,स्नेहसम्मेंलनात सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनपर कीर्तन कार्यक्रमात स्वयंसेवक म्हणून काम केलेल्या विद्यार्थिच्या तसेच श्री राणे,परशुरामकर,चेलानी,श्रीमती हनवते यांचाही पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.गया।