भंडारा,दि. 8:- भडारा तालुक्यातील निमगाव येथील पाणी पुरवठा योजनेच्या नियोजित जागेची पाहणी करुन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच मडावी, पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी निमगाव येथील गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून त्या सोडविण्याच्या आश्वासन दिले. निमगाव हे प्रकल्पग्रस्त गावांमध्ये समाविष्ठ असल्याने येथील शेती वैनगंगा नदीच्या पाण्याखाली येते. पाण्यामुळे शेती करणे अडचणीचे झाले आहे. शेतीहीन झाल्यामुळे येथील गावकऱ्यांकडे कोणतेही काम नाही, असे गावकरी म्हणाले. या परिसरातील गावांतील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा एकत्रित अहवाल तयार करुन पाठवावा. त्यावर मार्ग काढण्यात येईल असे श्री. पटोले म्हणाले.





