35.6 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home राष्ट्रीय देश ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपाध्यक्ष जेपी नड्डांच्या उपस्थितीत हाती घेतले कमळ

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपाध्यक्ष जेपी नड्डांच्या उपस्थितीत हाती घेतले कमळ

0
194

नवीदिल्ली(वृत्तसंस्था)11 मार्च – मध्य प्रदेशात आलेल्या राजकीय भूकंपानंतर अखेर आज ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्ष प्रवेश सोहळ्यात भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजपचे जेष्ठ नेते उपस्थिती होते.याच दरम्यान, काही सिंधिया समर्थकांचा एक वर्ग त्यांच्या भाजप प्रवेशाला विरोध करत होता. सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश न करता स्वतःचा वेगळा राजकीय पक्ष स्थापित करावा अशी मागणी ग्वाल्हेर येथील कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.पण, आता सिंधिया यांनी वेगला पक्ष न काढता भाजपमध्येच प्रवेश केला आहे.

वेगळा पक्ष काढा, सिंधिया समर्थकांची मागणी

सिंधिया यांनी मंगळवारी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यसभेत पाठवून केंद्रात मंत्रिपद दिले जाणार अशी शक्यता आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा बुधवारी केली जाऊ शकते. मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या सरकारमधील 6 मंत्र्यांसह 22 आमदारांनी सिंधिया यांच्या राजीनाम्याचे वृत्त समोर येताच काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी 5 ते 7 आमदारांना मध्य प्रदेशात भाजपची सत्ता स्थापित झाल्यानंतर मंत्रिपद दिले जाणार असे सुत्रांकडून समजते.