गोरेगाव,दि.१३ः-ः तालुक्यातील जि.प.प्राथ.शाळा आडकुटोला व आंगणवाडीच्या संयुक्त विद्यमाने कुपोषण मुक्त गाव व कोरोना वायरस जनजागृती रैली गावात फिरवण्यात आली. घोषवाक्ये देऊन गावात जनजागृती करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक बि.डी.पटले यांनी मार्गदर्शन केले.सहाशिक्षक हरिराम येळणे यांनी सविस्तर माहीती दिली..यासाठी शाळानायक साक्षी पटले,उपशाळानायक पियूष बिसेन,जानवी बिसेन,यामीनी चौधरी,प्रणव बिसेन,गौरव चौधरी,शिवानी बिसेन,समीर बिसेन,रूची चौधरी,रूमीत बिसेन,विष्णू रहांगडाले,राहूल रहांगडाले,तनवी गौतम,अक्षीत बिसेन,अस्मी रहांगडाले,नव्या बिसेन,आयुष बिसेन,अनशू रहांगडाले या विद्यार्थ्यांनी परिश्रम केले.





