
नागभीड,दि.14ः तालुक्यातील तळोधी जनकापुरजवळ काल रात्री धान्याचे पोते भरलेला ट्रक पलटून झालेल्या भीषण अपघातात दोन शिक्षकांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर ट्रकखाली चारचाकी वाहन दाबले गेल्याने त्यात या दोन शिक्षकांचा दुर्दवी मृत्यू झाला. यात महात्मा फुले हायस्कूल तळोधीचे मुख्याध्यापक गुलाबराव कांबळे व फटाले यांचा समावेश आहे.धान्याचे पोते ट्रकमध्ये भरून तळोधीवरून नागभीडकडे जात असतांना पळसगाव जनकापूर दरम्यानच्या रस्त्याचे काम सुरु असून जागोजागी खड्डे पडले आहेत.त्या खड्यामुळे धानाचे पोते भरलेला ट्रक जात असताना चालकाचे नियत्रण सुटले व रस्त्यावरून बाजूने जात असलेल्या शिक्षकांच्या चारचाकी वाहनावर सदर ट्रक पलटले.