लाखनी,दि.14ः-भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने येणाऱ्या काळात पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा बैठकींचे सत्र सुरू आहे. नुकतीच लाखनी तालुक्यातील केसलवाडा (वाघ) जिल्हा परिषद क्षेत्राची बैठक केसलवाडा (वाघ) येथे लाखनी तालुका काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून पार पडली.
जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रेमसागरजी गणवीर यांच्या अध्यक्षतेमध्ये ही बैठक संपन्न झाली. या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष शफीभाई लद्धानी,महासचिव तथा तालुका निरीक्षक अनिकजामा पटेल, दिलीप निखाडे, लाखनी तालुका अध्यक्ष राजु निर्वाण,पं. स. सभापती खुशाल गिदमारे, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, जि.प. सदस्य वंदनाताई पंधरे, पं. स. सदस्य रजनीताई आत्राम, घनशाम देशमुख, माजी जि.प. सदस्य जयकृष्ण फेंडरकर, रूपलता जांभुळकर, अनिल हारोडे, नंदू चौधरी, सेवादलचे लाखनी शहर अध्यक्ष अनिल बावनकुले, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत वाघाये, जि.प. क्षेत्र प्रमुख सूरज पंचबुद्धे, पं. स. क्षेत्र प्रमुख विजय पाटील वाघाये, विक्रम लांजेवार, माजी सरपंच लता वाघाये, सिपेवाड़ा येथील सरपंचा लता बुरडे, शामराव पाटील वाघाये, अ. जा. सेलचे तालुका अध्यक्ष रितेश कांबळे, साकेत सेलोकर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. तसेच सर्व गावातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये गावानुसार गाव समितीतील पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या संदर्भाने सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी यासंबंधाने आवश्यक सूचना दिल्या व मार्गदर्शन केले तसेच आजवरच्या कार्याचा आढावा घेतला. या माध्यमातून गावागावात आपलं संघटन तयार करा, ग्राम काँग्रेस कमिटी बनवून समितीच्या वतीने गावाच्या सुरुवातीला दर्शनी भागावर स्वागत फलक लावा. लोकांना काँग्रेसने केलेलं कार्य पटवून दया, पक्षाचं हित जोपासुन कार्य करा. सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवन्याच्या दृष्टीने सदैव प्रयत्नशील रहा असं मनोगत व्यक्त केलं. आज राज्यात सरकार आपलं आहे, विपरीत परिस्थितित देखील स्थानिक स्वराज्य संस्था आपन मिळवल्या होत्या आणि आज सत्ता असताना तर आपन सर्व सर्वांच्या मेहनतीने मिळून पुन्हा एकदा सर्वच्या सर्व जागा जिंकून येऊ असा विश्वास व्यक्त केला.
या बैठकीमध्ये भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष एड. शफीभाई लद्धानी यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात साकोली येथे १०० खाटांचे विस्तारित उपजिल्हा रुग्णालय मंजूर केल्याबद्दल तसेच शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला आणि सर्वानुमते तो एकमताने मंजूर करण्यात आला.या बैठकीला जि. प. क्षेत्रातील सर्व गावांचे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन प्रशांत वाघाये यांनी तर आभार प्रदर्शन शामराव पाटील वाघाये यांनी यांनी केले.