सदानंद फुलझेलेंचे निधन

0
458

नागपूर,दि.15ः-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 1956 च्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजक व दीक्षाभूमी स्मारक समिती नागपूरचे सचिव,माजी उपमहापौर सदानंद फुलझेले यांचे आज 15 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता वयाच्या 92 व्या वर्षी दीर्घ आजाराने धरमपेठ येथील निवासस्थानी निधन झाले.त्यांच्या निधनाने चांगला आबेंडकरी अनुयायी व डाॅ.बाबासाहेब आबेंडकरांचा खंदा समर्थक हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या निधनाबद्दल राजकीय नेत्यांपासून तर सामाजिक चळवळीतील नेत्यांनीही श्रध्दाजंली वाहीली आहे.