बोडमेठा जंगलात भुसुरूंग स्पोटाचा नक्षलवाद्यांचा बेत फसला

0
546

गडचिरोली,दि.16 मार्च: गडचिरोली जिल्ह्यातील हेडरी पोलीस मदत केंद्र अंतर्गत येणाऱ्या जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियानादरम्यान भुसुरुंग स्फोट घडवून आणत नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केल्याची घटना 15 मार्च रोजी घडली.मात्र जवानांनी नक्षलवाद्यांचा कट उधळून लावत प्रत्युत्तरादाखल व संरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने केलेल्या गोळीबारामुळे वाढता दबाव बघून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.बोडमेटा जंगल परिसरात पोलीस मदत केंद्र हेडरी येथील पोलीस जवान व सीआरपीएफ बटालियन 191 कंपनी सी चे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर जवानांनी शोधमोहीम राबविले असता घटनास्थळावर नक्षलवाद्यांनी आणखी एक भुसुरुंग पेरून ठेवल्याचे निदर्शनास आले. समयसूचकता दाखवत पथकातील जवानांनी सदर भुसुरुंग निकामी केला. त्याचबरोबर जवानांना घटनास्थळावरून मोठ्याप्रमाणावर नक्षल साहित्य हस्तगत करण्यात यश आले. जवानांनी नक्षलविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट उधळून लावण्यात यश मिळाले.