माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेवर, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली नियुक्ती

0
113

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.16- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रलंबित अशा राम मंदिरावर निर्णय तेणारे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची सोमवारी राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. माजी सीजेआय गोगोई यांनी अयोध्याच्या रामजन्मभूमी विवादावर सलग सुनावनी घेत प्रकरणी निकाली लावले होते. यासोबतच त्यांनी राफेल लड़ाकू विमानाच्या खरेदी प्रकरणात केंद्र सरकारला क्लीन चीट दिली होती.आपल्या सरन्यायाधिशाच्या कार्यकाळात 1950 पासून प्रलबिंत असलेला राममंदिराचा प्रश्न 13 महिन्यात निकाली काढला.तसेच सरकारच्या बाजूने अनेक निर्णय त्यांनी दिली.

मुख्य न्यायाधीशांविरोधात बोलले होते

जस्टिस रंजन गोगोई यांनी 10 जानेवारी 2018 ला तीन इतर जेष्ठ न्यायाधीशांसोबत मिळून मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी सर्वांनी जस्टिस मिश्रा यांच्यावर न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप लावला होता.