कोरोनाबद्दल अपवा पसरविणे ग्रा.प.सदस्याला पडले महागात,दोघावंर होणार कारवाई

0
464

भंडारा,दि.17ः-सध्या राज्यात सद्याच्या  करोना विषाणू (कोव्हिड-19) मुळे गंभीर परिस्थिती  निर्माण झाली असून सरकारकडून सर्वांनाच सावधतेचा इशारा देत अपवा पसरविण्यावर निर्बंध घातलेले असतांनाही त्या सुचनांकडे दुर्लक्ष केल्याने भंडारा जिल्ह्यात एका ग्रामपंचायत सदस्यासह अन्य एकावर भंडारा तहसिलदार यांनी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जवाहरनगर पोलिसांना दिले आहेत.राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 ची अमलबंजावणी करण्यात आली असतांना  सावरी येथील ग्रा.प.सदस्य संतोष ठवकरसह अन्य एकाने सोशल मिडीयाच्या माध्यमातून कोरोना रुग्णाबद्दल अफवा पसरविल्याने त्यांच्यावर भारतीय दंड सहिंता 1860 व आपत्ती व्यवस्थापन कलम 54 नुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.