अर्जुनी मोर राष्ट्रवादीची आढावा बैठक उत्साहात

0
105

अर्जुनी मोरगाव,दि.18ः- अर्जुनी मोरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक नवेगावबांध जि.प.विश्रामगृह येथे 17 मार्च रोजी घेण्यात आली.या आढावा बैठकीला प्रामुख्याने आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पंचमभाऊ बिसेन,प्रदेश सचिव विजय शिवणकर,युवक जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे,तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे उपस्थित होते.या बैठकीत येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात चर्चा करुन पक्ष बळकट करण्यावर भर देण्यात आले.निवडणुकीसाठी सर्वांना ताकदीने कामाला लागण्याच्या सुचना देण्यात आल्या.तालुक्यातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.