नागपूर,दि.20ः- जिल्ह्यातील कन्हान नगर परिषद हद्दीत येणाऱ्या सिहोरा गावातील मातीचे उत्खनन करण्याची परवानगी मिळण्यासाठी कन्हान नगर परिषदेकडून ना हरकत प्रमाणपत्राची मागणी करणाऱ्या ठेकेदाराला ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 1 लक्ष रुपयांची मागणी करुन 50 हजार रुपयाची लाच घेतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी अटक केली आहे.तक्रारदार ठेकेदाराला ही रक्कम द्यायची इच्छा नसल्याने एसीबीकडे तक्रार नोंदवली.त्यानंतर झालेल्या तडजोडीतुन 50 हजार रुपये देण्याचे ठरल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून गरुड चौक कामठी येथे ठेकेदाराकडून 50 हजार रूपयाची लाच मुख्याधिकारी गावंडे यांनी कार मध्ये स्वीकारताच अटक केली.याप्रकरणात जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.ही यशस्वी कारवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर व अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, शालिनी जांभुळकर, निशा उमरेडकर, राहुल बारई , राजेश बन्सोड यांनी केली.