जिल्ह्यात ३५९ व्यक्ती होम कॉरेन्टाईन मध्ये, ७३ जण विदेशातून दाखल

0
196

गोंदिया,दि.20 : कोरोना विषाणूच्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी शासन व यंत्रणा अतोनात प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे बाधित रूग्ण आढळले असले तरी गोंदिया जिल्ह्यात अद्यापपर्यत एकही बाधित रूग्ण सापडला नाही. असे असतानाही संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रशासन पुर्णत: खबरदारी घेत आहे. गोंदिया जिल्ह्यात ७३ जण विदेशातून प्रवास करून दाखल झाले आहेत. त्यांच्या संपर्कात २८६ व्यक्ती आले आहेत. अशा ३५९ व्यक्तींना जिल्हा प्रशासनाने कॉरेन्टाईनचा सल्ला दिला आहे.यापैकी ३ व्यक्तींचे वैद्यकीय अहवाल प्रशासनाला आले असून ते निगेटिव्ह आलेले आहेत.यापैकी एकाही व्यक्तीला कोरोना संसर्गाची लक्षणे नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा नोडल अधिकारी डॉ.संगीता पाटील यांनी दिली आहे.