श्री सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान येथील नवरात्र यात्रा रद्द

, मात्र चैत्र नवरात्र घट स्थापना होणार #पुढील आदेशापर्यंत पर्यंत दुकानेही बंद - आ. विनोद अग्रवाल

0
152

गोंदिया,दि.21ः-श्री सुर्यादेव मांडोदेवी देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा चैत्र नवरात्र उत्सव व घटस्थापनेचे नियोजन करण्यात आले होते. परंतु सध्या जागतिक पातळीवरील कोरोना विषाणूमुळे संपूर्ण भारतभर प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने गर्दी होऊ नये यासाठी सर्व कार्यक्रम, यात्रा, सभा रद्द करण्याचे शासनाचे आदेश दिले असून त्या अनुषंगाने श्री सुर्यादेव मांडोदेवी देवस्थान येथील यात्रा सुद्धा रद्द करण्यात आली आहे. आमदार विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली श्री सुर्यादेव मांडोदेवी देवस्थान येथे बैठक बोलावण्यात आली होती. त्यात नवरात्र यात्रा रद्द करून घटस्थापना आणि धार्मिक विधी नियोजित तिथीनुसार केली जाणार आहे. रवीवारपासून (22) सर्व दुकाने 2 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे निर्णय सर्वानुमते घेण्यात आले.

विशेष म्हणजे नवरात्र दरम्यान सामूहिक विवाह सोहळ्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. परंतु कोरोना जिवाणूंच्या प्रादुर्भावामुळे सामूहिक विवाह सोहळ्यात स्वागत समारोह रद्द करून सामूहिक विवाह सोहळा सामूहिकरीत्या न घेतात प्रत्येक दाम्पत्याना वेगवेगळी वेळ देऊन त्यांचे लग्न लावण्यात येणार असल्याचे माहिती श्री सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान समितीचे अध्यक्ष भैय्यालालजी सिंदराम यांनी दिली. यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी सर्व भाविकांना गर्दी न करणे व गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आव्हान केले असून रविवारी संपूर्ण भारतभरात होणाऱ्या जनता कर्फ्यू ला सहभाग देऊन आवश्यक नसल्यास घराबाहेर न निघण्याचे आव्हान केले आहे. नवरात्र दरम्यान होणारी यात्रा आणि महाप्रसाद कार्यक्रम सुद्धा रद्द करण्यात आले असून नवरात्र रामनवमी शोभायात्रा सुद्धा रद्द करण्याचे सभेदरम्यान सर्वानुमते ठरले.

तसेच श्री. सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान येथील सर्व दुकान मालकांशी चर्चा करून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करत पुढील सूचना मिळेपर्यंत दुकाने बंद ठेवण्यासंबधी चर्चा करण्यात आली. त्यावर दुकानदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत दुकाने 2 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्यास होकार दर्शविला. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना सारख्या जिवाणूवर मात करण्यासाठी सहकार्य करून गर्दीच्या ठिकाणी न जाता व गर्दी होणार नाही याची खबरदारी घेतल्यास लवकरच कोरोना जीवाणूचा नायनाट करता येऊ शकतो. नागरिकांनी कोरोना बाबत कोणतेही प्रकारची अफवा पसरू नये व अफवेवर विश्वास ठेवू नये असे आव्हान आमदार विनोद अग्रवाल यांनी यावेळी केले.

सभेदरम्यान श्री सुर्यादेव मांडोदेवी देवस्थान समिती  व्यवस्थापक अध्यक्ष भैयालाल सिदंराम, सचिव आ. विनोद अग्रवाल, सहसचिव कुसन घासले, सामूहिक विवाह समिती अध्यक्ष सीताराम अग्रवाल, ज्योती कलश समिती अध्यक्ष सखाराम सिद्राम, कोषाध्यक्ष मुन्ना भाऊ असाटी, व्यवस्थापक डॉ. लक्ष्मण भगत, पंडित अयोध्यादास पुजारी, गणपतलाल अग्रवाल, नंदकिशोर गौतम, डॉ. जितेंद्र मेंढे, हुकुमचंद अग्रवाल, शालिकराम उईके, राहुल अग्रवाल, शाम ब्राह्मणकर, योगराज धुर्वे, रामदास ब्राह्मणकर, किशोर शेंडे व सर्व दुकानदार मालक व कर्मचारी या वेळेस उपस्थित होते.