अर्जुनी मोरगाव,दि.22ः- तालुका काँग्रेस कमिटी अर्जुनी मोरगाव च्यावतीने कोरोना विषाणू बाबत जनजागृती करण्यासाठी व आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी आमदार सहसराम कोरोटे यांचे अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.या बैठकीला जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव रत्नदीप दहिवले,राजेश नंदागवळी,सडक-अर्जुनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मधुसूदन दोनोडे, नितीन पुगलिया, अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संतोष नरुले,शहर अध्यक्ष अनिल राजगिरे,देवेंद्र मानकर,दामोदर नेवारे,ब्रम्हानंद मेश्राम,अर्जुन घरोटे,सुखदास मेश्राम,दिनेश कोरे,ईश्वरदास लंजे,एकनाथ झिंगरे,दिनेश हुकरे,पुष्पाताई खोटेले,धनराज आसतकर, छोटेलाल मेश्राम,निकेश उके,फुलचांद चौरे,हेमू वालदे,वसंत पुराम,किसान काँग्रेसचे तालुका अध्यक्ष देवाजी कापगते जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीकांत घाटबांधे, जगदीश पवार,तालुका काँग्रेसचे महासचिव इंद्रदास झिल्पे,कमल जायस्वाल,परेश उजवणे,वेदप्रकाश राठोड,अशोक कापगते,हरिभाऊ नैताम,डॉ.भेंडारकर,राजन खोब्रागडे,हविंद्र तागडे व तालुक्यातील इतर कार्यकर्ते उपस्थित होते.