नवी दिल्ली,दि.22: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रेल्वेनं मोठा निर्णय घेतलाय. ३१ मार्चपर्यंतच्या सर्व प्रवासी गाड्या रेल्वे मंत्रालयाने रद्द केल्या आहेत. या काळात एक्स्प्रेस, पॅसेंजर, इंटरसिटी अशा सर्व गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत. या दिवसांमध्ये केवळ मालगाड्या सुरू राहतील. लांब पल्ल्यांच्या गाड्यांपाठोपाठ लोकल सेवादेखील बंद करण्याचा विचार रेल्वे मंत्रालयाकडून सुरू आहे. याबद्दलचा निर्णय आज दिवसभरात होण्याची शक्यता आहे.काही कोरोनाबाधितांनी रेल्वेने प्रवास केल्याने हा निर्णय रेल्वेला घ्यावा लागला आहे.