साकोली,दि.23 :येथील ताराचंद बोरकर यांची कन्या अपूर्वा ताराचंद बोरकर हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश संपादन करून आईवडिलांचा मान उंचावला आहे. तिने हजारो तरूण-तरूणींना आदर्श संदेश दिला आहे. साकोली तालुक्यातील सोसायटी शाळेत प्राथमिक शिक्षण तिने पूर्ण केले. त्यानंतर बीएससी इन्स्टीट्यूट सायन्स कॉलेज नागपूर तर एमएससी गणित नागपूर येथील कॅम्पस कॉलेजमधून पूर्ण केले. तिच्या वडिलांचे फुटपाथवर रेडीमेडचे दुकान आहे. गरिब कुटुंबात जन्माला आल्याने लहानपणापासूनच स्वकष्टाची जाणीव, जिवनात अनेक अडचणी व आर्थिक संकटांना तोंड देण्याची जाणीव निर्माण झाली होती. फक्त गृहिणी बनून आयुष्य जगायचे नाही तर महिला ही एक शक्ती आहे, याच जिद्द व चिकाटीने ती महिला उपनिरीक्षक पदाची साकोली तालुक्याची मानकरी ठरली आहे. यासाठी तिचे आईवडिल, शिक्षक घुले, मित्रपरिवार यांनी शैक्षणिक, आर्थिक सहकार्यकेले.