सर्व बँकांनी रोख व्यवहारास प्राधान्य दयावे-जिल्हाधिकारी यांचे आदेश

Ø  दोन ग्राहकांमध्ये एक मीटर अंतर ठेवावे

0
192

भंडारा,दि. 23 :- करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 लागु केला असून या कायद्यान्वये   प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी भंडारा यांनी सर्व बँका, पतसंस्थामध्ये रोख रक्कम भरणे व काढणे या दोनच कामांना प्राधान्य देण्याचे आदेश आज निर्गमित केले आहे.

भंडारा जिल्हयाचे कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलमान्वये जिल्हयातील सर्व बँक तसेच पतसंस्था यांनी कर्मचाऱ्यांना बँकेमध्ये 31 मार्च पर्यंत रोख रक्कम भरणे व काढणे ही दोनच काम प्राधान्याने करण्याचे आदेश निर्गमित करावेत. तसेच बँकांनी पुरेसे कर्मचारी रोखीच्या कामासाठी नेमावेत.. जेणकरुन ग्राहकांना बँकेच्य शाखेमध्ये कमीत कमी वेळ व्यतीत करता येईल.

बँकांनी एक वेळेस  जास्तीत जास्त 4 ते 5 ग्राहकांना शाखेमध्ये येण्यास परवानगी दयावी व प्रवेश केलेल्या ग्राहकांचे काम झाल्याशिवाय पुढील ग्राहकांना बँकेच्या आतमध्ये येण्यास परवानगी देण्यात येवू नये. त्याचप्रमाणे दोन ग्राहकांमध्ये रांगेत एक मीटर इतके अंतर ठेवावेत. सर्व बँकांनी आपआपल्या ग्राहकांना इतर वितरण पर्यायांचा म्हणजेच इंटरनेट बँकीग, मोबाईल बँकीग, युपीआय, ऐटीएम व कॅश डिपॉझिट मशिन इत्यादी सुविधांचा वापर करण्याबाबत जागृती करुन आवाहन करावे.

बँकेमध्ये ग्राहकांना काऊंटर पासून एक मीटर अंतर ठेवणेबाबत सुचित करावे. सर्व बँकांनी आपआपले ऐटीएम, कॅश-चेक डिपॉझिट, पासबुक प्रिंटींग इत्यादी सेवा असणाऱ्या मशिनची वेळोवेळी स्वच्छता करावी. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना व ग्राहकांचे सॅनिटायझर-साबन व पाण्याने हात स्वच्छ धुण्यासाठी व्यवस्था करावी. उपरोक्त आदेशाची अवाज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तींनी अथवा संस्थेने शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमुद आहे.