गोंदिया दि. 23 परराज्यातून कोरोना विषाणू बाधित व्यक्ती प्रवासी वाहनाने राज्यात प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा व्यक्तीकडून राज्यात अजाणतेपणे कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात देवरी येथील आंतरराज्य सीमा तपासणी नाका, चेक पॉइंट रावणवाडी व आमगावजवळ लांजी मार्गावर असलेल्या सीमा तपासणी नाक्यावर बऱ्याच मालवाहू तसेच प्रवासी वाहनांची वर्दळ असते. या सीमा तपासणी नाक्यावर परराज्यातून बस, कार व जीप इत्यादी वाहनातून प्रवेश करणाऱ्या सर्व प्रवाशांची आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यासाठी पथक गठित करण्यात आले आहे. या पथकामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, पोलिस विभागाचे अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या अधिकार्यांचा समावेश करण्यात आला आहे.