वसुंधरा फाऊंडेशनचा पुढाकार

0
89

नागपूर,दि.23 : जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच राज्यातही त्यास रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने कार्यरत पोलीस कर्मचारी आणि महानगर पालिका कर्मचारी अविरतपणे स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता कार्य करीत आहेत.त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी वसुंधरा सोशल फाऊंडेशनच्यावतीने पोलिसांना चहा, पाणी वाटप आणि महानगर पालिका कर्मचाऱ्यांचा सुरक्षितेचा दृष्टीकोनातून हॅन्ड गोल्ज वाटप करण्यात आले. यावेळी योग शिक्षिका ज्योसना ताई इंगळे, सतीश काका गिरमकर, वसुंधरा सोशल फाऊंडेशन अध्यक्ष समीर काळे, मयूर खोरगडे, मनीष धकाते, शुभम राऊत, वैभव आबदेव, यशवंत लिगाईत, विवेक डाखोळे, विजय राठोड यांनी सहकार्य केले.