मुंबई, पुणे व इतर राज्यातून परत आलेल्या व्यक्तींची संख्या 1589

0
113

भंडारा,दि.24 :- भंडारा जिल्हयातील विदेशातून परत आलेल्या दहा व्यक्तीची नोंद घेण्यात आल्याने  शीघ्र प्रतिसाद पथकाने भेट दिलेल्यांची संख्या 40 झाली आहे. त्यापैकी चोवीस व्यक्तींना होम क्वारंटाईन देखरेखीत ठेवण्यात आले असून सोळा  व्यक्तींना नर्सिंग होस्टेल येथील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. नर्सिंग होस्टेल येथील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या सोळा सहवासितांपैकी दोन व्यक्तींचे घश्यातील नमुने निगेटिव्ह आलेले असल्याने त्यांना  सुट्टी देण्यात आली आहे. सध्या नर्सिंग होस्टेल येथील अलगीकरण कक्षात 14 व्यक्ती भरती आहेत.

कोरोना बाधित गंभीर रुग्णास रुग्णालयात भरती केल्यानंतर त्याबाबत करावयाच्या उपचाराकरीता जिल्हास्तरावर व्हेंटिलेटरबाबत वैद्यकीय अधिकारी व पॅरामेडीकल स्टॉफ यांची प्रशिक्षणाची पुर्वतयारी केली आहे. तसेच नागपूर येथे विभागीय स्तरावर व्हेंटिलेटरबाबत वैद्यकीय अधिकारी यांचे पाच दिवसीय प्रशिक्षण होणार आहे. आतापर्यंत पुणे, मुबई व इतर राज्यातून 1 हजार 589 व्यक्ती आले असून सर्वांना होम क्वारंटाईन करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. भंडारा जिल्हयामध्ये आजपावेतो एकही कोरोनाग्रस्त रुण आढळलेला नाही. जिल्हयात संचारबंदी असल्यामुळे जवाहरनगर नाक्यावर बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्याकरीता चार चमु तयार करण्यात आली असून थर्मल स्कॅनद्वारे तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी “ मीच माझा रक्षक ” या संदेशाचे पालन करावे.

सर्व   सहवासितांना प्राऊड टू प्रोटेक्ट भंडारा होम क्वारंटाईन हे स्टॅम्प मारण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष दोन तयार करण्यात आले असून जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 07184-251222 व जिल्हा सामान्य रुग्णालय -क्रमांक 07184-252247 आणि  आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भंडारा क्रमांक 07184-252317 यावर संपर्क साधावा.