अर्जुनी-मोर तालुक्यात लाॅकडाऊन संबंधाने पोलीस विभागाकडून जनजागृती

0
95

अर्जुनी-मोर(संतोष रोकडे)दि.25ः संपूर्ण भारतभर कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारने 25 मार्च ते 14 एप्रिल पर्यंत लाॅकडाऊन केले आहे.या काळात लागू असलेल्या जमावबंदी व संचारबंदीला सहकार्य करीत स्वतःच्या घराबाहेर जनतेने पडू नये यासाठी अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याच्यावतीने गावागावामध्ये स्पिकरच्या माध्यमातून सुचना देत जनजागृती करण्यात येत आहे.अर्जुनी मोर पोलीस स्टेशनचे ठाणेदार महादेव तोडले यांनी अर्जुनी-मोर पोलीस हद्दीतील गावागावात गाडीतून फिरून लाउडस्पीकर वर आवाहन करून घराच्या बाहेर न निघण्याचे आवाहन केले. मात्र काही समाजकंटक तंबाखूजन्य पदार्थ विकण्यात अधिक नफा कमावण्याचा प्रयत्न करीत आहेत.किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थाचे विक्री केली जात आहे. यावर पायबंद घालण्याची मागणी जनतेकडून होत आहे.पानठेले बंद झाल्याने तंबाखूजन्य खर्रा व गुटखा विकण्यासाठी पानटपरी चालक नवनव्या युक्त्या शोधून काढीत आहेत. राहत्या घरी खरा बनवून वाममार्गाने विकत आहेत यावर प्रतिबंध घालण्याची मागणी जनतेकडून होत आहे.