वर्धा,दि.25ः- -येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षाला आज 25 मार्च रोजी अचानक आग लागल्याने सीसीटीव्ही कंट्रोल रुम जळुन खाक झाल्याची घटना घडली आहे.शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून या आगीमुळे पोलीस यंत्रणेत अचानक खडबळ माजली आहे. पोलिसांनी धावपड करीत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
संचारबंदी आणि लॉकडाऊन सारख्या गंभीर विषय हाताळण्यात व्यस्त असणाऱ्या पोलिस यंत्रणेच्या कार्यालायलात आज अचानक आग लागली. दुपारच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्ष आणि सीसीटीव्ही कंट्रोल रुम या दोन्ही ठिकाणी आग लागली. आग विझविण्यासाठी अग्नीशामक दलाची मदक घेण्यात आली.पोलीस कर्मचारी आणि अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले आहेत. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी सिसीटीव्ही कंट्रोल रुमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.