राज्य सेवेच्या परीक्षेत स्वप्नील गेडामचे सुयश

0
176

सावली,दि.26ः येथील स्वप्नील मनोहर गेडाम याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश संपादन करून आई-वडिलांचा मान उंचावला आहे. त्याने स्पर्धा परीक्षा देणार्‍या हजारो तरुणांना सातत्याने प्रयत्न केल्यास यशस्वी होऊ शकतो, असा संदेश त्याने दिला आहे.
सावली येथील जि.प. शाळेत १ ते ४ तर रमाबाई आंबेडकर विद्यालय येथे ५ ते १२ पयर्ंत त्याने शिक्षण घेतले. दहावीत ७५ टक्के तर १२ वीत कला शाखेत ८0 टक्के गुण मिळवून त्याने गडचिरोली येथे डी.एड. केले. तिथूनच पदवी शिक्षण पूर्ण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चंद्रपूरमध्ये एका खासगी रुग्णालयात काम करीत स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. ते करीत असताना वनविभागाची परीक्षा उत्तीर्ण करुन वनरक्षक म्हणुन वनविभागात नौकरी करू लागला.
पहिल्यांदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुख्य परीक्षेत ४ गुणांनी हुलकावणी मिळाली. पण, जिद्द न सोडता २0१८ च्या राज्य सेवा परीक्षेत पोलिस उपनिरीक्षक म्हणून यश संपादन केले व राज्यात १७ वा रँक मिळविला. गरीब कुटुंबातील असल्याने स्वकष्टाची जाणीव होती, अनेक अडचणी व आर्थिक संकटात सामना देण्याची तयारी होती. या जिद्दीच्या जोरावरच उपनिरीक्षक पदाचा सावली तालुक्याचा मानकरी ठरला आहे. यासाठी आई-वडील, दोन भाऊ व मित्रांनी शैक्षणिक, आर्थिक सहकार्य केले.