
सालेकसा,दि.18ः-कोरोना संसर्गामुऴे संचारबंदी असतानाच सालेकसा तालुक्यातील कुलरभट्टी परिसरात सागवन तस्करांच्या टोळीने धुमाकूळ माजवला होता.जंगलातील उच्च प्रतीचे सागवान वृक्ष तोडून त्याची तस्करी करीत असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाताच सापळा रचण्यात आला. ज्यात सागवन तस्करांना रंगेहात पकडण्यात पथकाला यश मिळाले.यात आरोपी म्हणून सुनील उईके, अजय उईके, अनिल उईके, अशोक नरोटी व जीतलाल उईके सर्व राहणार कुलरभट्टी यांना लाकूड चोरताना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्य मध्ये १५ नग सागवण सिल्ली प्रत्येकी घनता 0.441 घनमीटर व झाडे कापण्याची मोठी आरी व इतर साहित्य गोळा करण्यात आला. सदर वव्यक्तींवर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) ई अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे. सदर गुन्ह्यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी ए. बी. इलमकर यांनी दिली. सदरची कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी इलमकर, वनपाल मानागड क्षेत्र डी. डी. मेश्राम, वनरक्षक जे. एम. बघेले, वनरक्षक एस. आर. पेरे, वनरक्षक एल. पी. बिसेन व वनकर्मचारी यांनी केली.





