
लाखांदूर,दि.19ः सध्या देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. अशाच वेळी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले हे मुंबईत आहेत. मात्र मुंबईत असून देखील मतदारसंघाची काळजी ते घेत आहेत.लाखांदुर तालुक्यातील दिघोरी जि.प. क्षेञातील जनतेला महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले व मित्र परिवाराच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या कुटुंबांसाठी जवळपास सात हजार किटचे वितरण करण्यात आले. संपूर्ण मतदारसंघात ह्या किट वाटल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले संपुर्ण साकोली विधानसभा क्षेत्रातील दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या कुटुंबांना जिवनावश्यक वस्तुंची किट बनवुन त्या गरजु पर्यंत उपलब्ध करून देत आहेत.आज १९ एप्रिलपासून सुरुवात होऊन दिघोरी जिल्हा परिषद क्षेञातील दिघोरी, मालदा, झरी, मुर्झा, पारडी, मुरमाडी, चिचाळ, जैतपुर, कोदामेडी, खोलमारा, चिकना, तावशी व साखरा येथे किटचे वाटप करण्यात आले.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंब जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी धडपड करत आहेत मात्र लॉकडाऊन असल्यामुळे तेही शक्य नाही. अशा परिस्थितीत जेव्हा जीवनावश्यक वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचतात तेव्हा निश्चितच तो क्षण त्यांच्यासाठी आनंददायी असतो. आणि हेच कार्य विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या संकल्पनेतून होतं आहे.सदर किटचे वितरण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भुमेश्वर महावाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयक उत्तम भागडकर, पं. स. सदस्य गुलाब कापसे, लताताई हत्तीमारे, अशोक चांडक, संजय राव, प्रशांत अवचट, सुभाष खिलवानी, संजय धकाते व अन्य कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.




