सालेकसा,दि.13ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉक डाउन लावण्यात आले आहे. गोंदिया जिल्हा ग्रीन झोन मध्ये मोडत असल्याने जिल्ह्यातील सर्व व्यवसाय आणि आस्थापनांना परवानगी देण्यात आली. तरीही मात्र शासकीय कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या कामाची विचारपूस केली असता कोरोना मुळे कर्मचारी नसल्याने काम उशिरा होत असल्याचे कारणे ऐकायला मिळतात. नगर पंचायत सालेकसा मध्ये सध्या अशीच परिस्थिती बघायला मिळत आहे. आमगाव खुर्द परिसरातील नागरिक असलेले नंदलाल परसमोडे यांनी घरकुल योजने करिता अर्ज केला होता मात्र त्यांच्या अर्जाला वर्षपूर्ती होत असून अद्याप त्यांच्या अर्जावर काहीही कार्यवाही झालेली नाही. सध्या त्यांचा घर मोडकीस आला असून ताडपत्री, प्लास्टिक अंथरून घर कसेबसे बांधून ठेवले आहे. महिन्याभऱ्यात पावसाळ्याला सुरुवात होणार असून शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत असताना मात्र नंदलाल परसमोडे यांच्या चिंता वाढल्या आहेत. पावसाळ्या आधी जर घराचे काम पूर्ण न झाल्यास त्यांचे घर उघड्यावर येऊन हालअपेष्टा शोसाव्या लागू शकतात. विशेष म्हणजे नंदलाल परसमोडे यांच्या मागून अर्ज करणाऱ्यांचे घरकुलचे काम पूर्ण झाले आहेत. मात्र नंदलाल यांना हिंदी चित्रपटासारखे तारीख ते तारीख मिळत असून त्यांचा घरकुलची फाईल कुठे गहाळ झाले ते देवच जाणे. पावसामुळे कदाचित त्यांचे घर क्षतीग्रस्त होऊ शकते त्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधी त्यांचा घरकुलचे काम सुरू करण्याची मागणी लाभार्थी नंदलाल परसमोडे यांनी केली आहे.
“आपल्या निकटवर्तीय लोकांचे घरकुलचे काम आधी करण्याचा नादात अत्यंत गरजू लाभार्थी मात्र ह्यातून वंचित ठेवण्याचे काम नगर पंचायत जाणून करत आहे”
– ब्रजभूषण बैस
तालुका अध्यक्ष मनसे