गोंदिया जिल्हयातील सर्व विजबिल भरणा केंद्र सुरु

0
420

गोंदिया दि. 13.: – कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार गोंदिया जिल्हयातील महावितरणतर्फे सर्व विजबिल भरणा केंद्र बंद करण्यात आले होते. परंतू आता गोंदिया जिल्हयाचा समावेश ग्रिन झोन मध्ये झाल्याने महावितरण मुख्य कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार गोंदिया जिल्हयातील सर्व विजबिल भरणा केंद्र पुर्ववत सुरु करण्यात आलेले आहे.

सर्व विज ग्राहकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या मोबाईलवर महावितरणचा आलेल्या एसएमएस (संदेश) व्दारे किंवा जुन्या विज बिलावरील ग्राहक क्रमांक विजबिल भरणा केंद्रातील कर्मचारी यांना दाखवून  ते आपल्या विज बिलाचा भरणा करु शकतात.

विजबिल भरणा केंद्र बंद असल्यामुळे विजबिल वसुली फारच अल्प प्रमाणात झालेली असून गोंदिया परीमंडळाअंतर्गत दि. 12.05.2020 पर्यंत ऑनलाईन सुविधेमार्फत विज ग्राहकांनी विजबिलाचा भरणा केल्याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

मंडल कार्यालय मार्च-2020 एप्रिल-2020 मे-2020

(12.05.2020 पर्यंत)

भंडारा 5 करोड 10 लाख 2 करोड 5 लाख 55 लाख
गोंदिया 6 करोड 60 लाख 2 करोड 18 लाख 75 लाख
गोंदिया परीमंडळ एकुण 11 करोड 70 लाख 4 करोड 23 लाख 1 करोड 30 लाख

 

गोंदिया जिल्हयातील सर्व विज ग्राहकांनी विजबिलाचा नजीकच्या विजबिल भरणा केंद्रात जावून तसेच सोशल डीस्टसिंग (Social distancing) चे पालन करुन भरणा करावा व त्या व्यतिरिक्त महावितरणची वेब साईट, मोबाईल ॲप किंवा इतर ऑनलाईन पर्यायाव्दारे विजबिलाचा भरावा करावा व सहकार्य करावे असे आवाहन महावितरण गोंदियातर्फे करण्यात येत आहे.