
गडचिरोली,(जिमाका),दि.07: महाराष्ट्र शासन, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग अंतर्गत आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयाच्या मार्फत अनुसूचित जमातीच्या (ST) उमेदवारांकरीता (गट-क व गट-ड) तलाठी/पोलीस/कृषि सेवक/ग्रामसेवक/आरोग्यसेवक/लिपीक -टंकलेखक/ विस्तार अधिकारी (सांख्यिकी) इत्यादी स्पर्धापूर्व पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन राबविण्यात येत आहे.
त्यासाठी उमेदवारांनी https://forms.gle/Uw74H2SXHsCGuDPd6 या लिंकवर गुगल फॉर्म मध्ये आपला अर्ज भरुन देण्याची विनंती आहे. उमेदवारांच्या निवडीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती बद्दल आपल्या व्हॉट्सॲप मोबाईल क्रमांकावर किंवा ई-मेल वर कळविण्यात येईल. प्रशिक्षणासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे. 1) किमान शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा. उच्च शैक्षणिक अर्हता धारकास प्राधान्य. 2) उमेदवारांचे वय 18 ते 37 दरम्यान असावे. 3) उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 4) यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
उपरोक्त लिंक वरील फॉर्म मध्ये माहिती भरुन ऑनलाईन स्पर्धापूर्व पायाभूत प्रशिक्षण घेण्याकरीता इच्छुक उमेदवारांनी नोंदणी करावी असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.




