34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home महाराष्ट्र राज्यात १ एप्रिल ते ११ जुलै या कालावधीत १ कोटी ६६ हजार...

राज्यात १ एप्रिल ते ११ जुलै या कालावधीत १ कोटी ६६ हजार ७३९ शिवभोजन थाळ्यांचे वाटप – मंत्री छगन भुजबळ

0
367

blank

मुंबई, दि. 12 : राज्यात दि. 1 एप्रिल ते दि. 11 जुलै या कालावधीत 1 कोटी 66 हजार 739 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यात गरीब व गरजूंना एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040, जून महिन्यात 30 लाख 96 हजार 232, जुलै मध्ये आतापर्यंत 10 लाख 87 हजार 210 असे एकूण दि. 1 एप्रिल ते दि. 11 जुलै या कालावधीत 1 कोटी 66 हजार 739 शिवभोजन थाळ्या वाटप केल्या आहेत.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय मार्चमध्ये घेतलेला होता. हा सवलतीचा दर जूनपर्यंत लागू करण्यात आलेला होता. मात्र अजूनही नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा सवलतीचा पाच रुपये दर सप्टेंबर पर्यंत लागू राहणार आहे.

blank