
गोंदिया,दि.14ः-राज्यसरकारने आज काही आयएएस अधिकार्यांच्या बदल्या केल्या असून सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा श्रीकृष्ण पांचाळ यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया या रिक्त पदावर केली आहे.ते 2016 बँचचे आयएएस अधिकारी आहेत.श्री पांचाळ हे उद्या 15 जुर्लेरोजी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खेवले यांच्याकडून पदभार स्विकारणार आहेत.
सौरभ कटियार (mh 2016)
सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू पालकर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला या रिक्त पदावर
कुमार आशीर्वाद (mh 2016)
सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली या रिक्त पदावर
इंदूराणी जाखड (mh 2016)
सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी या पदावर
अभिनव गोयल (mh 2016)प्रकल्प अधिकारी,किनवट तथा सहायक जिल्हाधिकारी नांदेड़ यांची लातूर जिल्हापरिषद येथे सीईओ पदावर नियुक्ती





